अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून दोन लॅपटॉप चोरले. शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यात शनिवारी रात्री साडेबारा ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.
अक्षय पांडुरंग निकम (वय 24) हे मित्र संकेत गुंड यांच्यासमवेत बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यातील अपार्टमेंटमध्ये राहतात. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
टेबलावरील लिनोव्हा कंपनीचे दोघांचेही दोन लॅपटॉप सुमारे 10 हजार रुपये किंमतीचे चोरले. अक्षय निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम