अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात सध्या दरोडे, खून, अत्याचार,चोरी यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दररोज जिल्ह्यातील कोणत्या ना भागात आशा घटना घडत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगांव शिवारातील कुकडी चारीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

file photo
या बाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर घातपात असल्याची शक्यता वर्तविली आहे.
मागील महिन्यात विसापूर जंगला लगत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता.ही घटना ताजी असतानाच आता हा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
आता या मृत अनोळखी व्यक्तीची ओळख पटवणे श्रीगोंदा पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम+