Ahmednagar Crime : घरात घुसून मारहाण..! एकाचा मृत्यू, दोन जखमी

Published on -

Ahmednagar Crime : अकोले तालुक्यातील आंबेवंगण येथे बुधवारी (दि.९) रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजावर लाथा मारून घरात घुसून सात ते आठ जणांच्या टोलक्याने हल्ला करत त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

त्यामध्ये पांडुरंग सोमा खेताडे (वय ५०, रा. आंबेवंगण, ता. अकोले) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा व पत्नी जबर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धोंडू पांडुरंग खेताडे (वय २५, रा. आंबेवंगण ) याने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, (दि.९) ऑगस्ट रोजी रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी धोंडू पांडुरंग खेताडे त्याची आई-वडील आंबेवंगण (ता. अकोले) येथे घरी असताना त्याचे ओळखीचे बबलू कदम व प्रमोद घारे (दोघेही रा. मान्हेरे, ता. अकोले) व त्यांचे मित्र वैभव डगळे,

वैभव गभाले, सागर भोईर, विकास गभाले, अक्षय कोंडार, विठ्ठल पोटकुले, विनोद शिंदे, नकुल मुंढे व इतर तीन चार अनोळखी इसम सचिन इदे यास बबलू कदम यासोबतचे वाद मिटवून घे, असे म्हणाल्या कारणावरून दुचाकीवरयेऊन घरात घुसली.

घराच्या दरवाजावर लाथ मारून दरवाजा उघडला व आतून कडी लावून फिर्यादीस मारण्यास सुरुवात केली. मात्र त्याचे वडील पांडुरंग सोमा खेताडे मध्ये पडले. मात्र त्यांनी काठ्या दांडक्याने मारहाणीस सुरुवात केली. सदर मारहाण सुरू असताना जोरजोरात ओरडत होते.

तिघेही रक्त भंबाळ झाले. पांडुरंग खेताडे यांच्या डोक्यावर व मानेवर दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या ओरडण्याने चुलता किसन सोमा खेताडे व चुलती हिराबाई किसन खेताडे हे आल्यानंतर सर्वजण पळून गेले. त्यावेळी पांडुरंग खेताडे यांना फिर्यादी व त्याची आई यांनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही प्रतिसाद देत नव्हते.

त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह लोणी येथील रुग्णालयात पाठविला होता. तर जखमी धोंडू खेताडे व त्याची आई यांच्यावर राजुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe