Ahmednagar Crime : मी जीव देईल व चिट्ठीत तुझे नाव लिहीन धमकीला ‘ती’ घाबरली ! आणि त्याने तिच्यावर….

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मुळची पारनेर तालुक्यातील व सध्या नवी मुंबई येथे राहत असलेल्या युवतीवर शेवगाव येथील तरुणाने नगर – दौंड रोडवर बाबुर्डी बेंद फाट्याजवळ असलेल्या लॉजवर व नवी मुंबई येथील रूमवर अत्याचार केला.

तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पीडित युवतीने मंगळवारी (दि.२२) रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश रमेश कांबळे (रा. शेवगाव) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी युवती पारनेर तालुक्यातील रहिवाशी आहे. ती सध्या नोकरीनिमित्ताने नवी मुंबई येथे राहते. तिची नगरच्या न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये शिकत असताना महेश कांबळे सोबत ओळख झाली होती.

त्या ओळखीतून तो तिच्याशी नेहमी मोबाईल वर संपर्क करायचा. त्याने तिला एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिने नकार दिल्यावर त्याने मी जीव देईल व चिट्ठीत तुझे नाव लिहीन अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी युवती त्याला भेटण्यासाठी नगरमध्ये आली असता त्याने ११ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री बाबुर्डी बेंद फाट्याजवळ असलेल्या एका लॉजवर घेऊन जात अत्याचार केला.

तिचे फोटो काढले व ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा दि. १२ ऑगस्ट रोजी अत्याचार केला. त्यानंतर दि. १३ ऑगस्टला तो तिच्या बरोबर मुंबईला गेला कांबळे याने पीडिता राहत असलेल्या नवी मुंबई येथील रूमवर तिच्यावर अत्याचार केला व कोणाला काही सांगितले तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.

दरम्यान, सदरची घटना युवतीने आईला सांगितली व त्यांनी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी महेश कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग अधिक तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe