Ahmednagar Crime : आमचे घर आहे म्हणत सासरवाडीच्या लोकांनी जावयाला बेदम चोपला, अहमदनगरमधील घटना

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar News : जावई व जावयाचा पाहुणचार या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. सासुरवाडीला गेल्यानंतर जावयाचा किती थाटमाट असतो हे देखील सर्वांनाच माहित आहे. जावयाचा शब्द हा सासुरवाडीला अंतिम असतो.

परंतु आता एक वेगळीच घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेदम मारले आहे. हे घर आमचे आहे, तू येथे राहू नको, असे म्हणत मेहुणा, पत्नी, सासू, सासऱ्यांनी जावयाला मारहाण करण्याची घटना श्रीरामपुरात घडली आहे.

याबाबत, लालू ईश्वर गायकवाड (वय-४७, धंदा प्लंबींग, रा. आगाशे नगर, डिपॉल शाळेजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन वर्षापासून आपण विभक्त राहतो. ७ एप्रिलला ७.३० ला माझा मेहुणा, सासरा,

सासू, पत्नी मी राहत असलेल्या घरासमोर आले व हे घर आमचे आहे, तू येथे राहू नको, असे म्हणत आपल्याला शिवीगाळ करू लागले. तेव्हा त्यांना समजावून सांगत असताना मेव्हण्याने हातातील लाकडी दांड्याने आपल्याला मारहाण केली.

तसेच पत्नी, सासू, सासरा यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तू येथे राहीला तर तुला जिवे ठार मारू अशी धमकी दिल्याचे लालू गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यावरून ऋषिकेश कैलास जाधव,

किसन रामभाऊ जाधव आणखी दोघे असे चौघांच्या विरूद्ध भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe