सहाय्यक दुय्यम निबंधकांच्या चौकशीत दस्त नोंंदणीची बनावटगिरी उघड; सहा जण आरोपी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तोतया व्यक्तीस उभा करून दस्त नोंदणीमध्ये बनावटीकरण झाले. याप्रकरणी सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 419, 420, 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक गणेश महादेवराव बानते (वय 54 रा. आनंदधामजवळ, बुरूडगाव रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अशोक मदनलाल मवाळ, सविता भारत मवाळ, संतोष ओमप्रकाश सारसर,

योशीता मृदुल मवाळ, भारत अशोक मवाळ, मृदुल अशोक मवाळ (सर्व रा. सावेडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, 5453/2020, 4460/2020, 5263/2020 हे दस्त ज्या मुख्त्यार पत्राच्या आधारे नोंदणी करण्यात आले.

त्या दस्तऐवजी मुख्त्यार धारक यांच्या मुख्त्यार पत्रातील फोटो खरेदीखतातील मुख्त्यार धारक यांचे फोटोमध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे.

तीनही दस्तांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 23 सप्टेंबर 2020 ते 28 ऑक्टोबर 2020 रोजीच्या दरम्यान सह दुय्यक निबंधक वर्ग 2 येथे आरोपी अशोक मवाळ,

सविता मवाळ, संतोष सारसर, योशीता मवाळ, भारत मवाळ (सर्व रा. सावेडी, नगर) यांनी संगनमताने मुख्त्यार दस्त 4460/2020,

खरेदी दस्त 5453/2020 व हक्क सोड दस्त 5263/2020 हे तोतया इसम म्हणून मृदुल अशोक मवाळ यास उभा करून व बनावटीकरण करून पंकज अशोक मवाळ (रा. मदनचंद्र कॉम्प्लेक्स मारूती नगर, सावेडी) यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe