Ahmednagar Crime : अकोले शहरातील बाजारतळावर गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता प्रदिप सुरेश वाघिरे (वय २४ रा. शाहूनगर, अकोले) या तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला.
चाकू हल्ला करणाऱ्या तीन आरोपींवर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या वाघिरे याची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, अकोले बाजारतळावर वाघिरे यांचे मसाल्याचे दुकान आहे. प्रदिप सुरेश वाघिरे (शाहूनगर) हा दुकान आवरत असताना गुरुवारी रात्री ८ वाजता गणेश माने (कल्याण), गणेश विजय चव्हाण, विजय बबन चव्हाण (रा.अकोले) हे तिघे दुकानावर आले. गणेश माने याने प्रदिप वाघिरे याचे पोटात चाकूने सपासप वार केले व तेथून पळाला
प्रदिपचे भाऊ संदिप सुरेश वाघिरे, आकाश सुरेश वाघिरे यांनी त्याचा पाठलाग करुन सर्वोदय कॉम्प्लेक्सजवळ माने यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत जखमी झाल्याने गणेश माने याचेवर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
तर चाकूने भोसकलेले प्रदिप वाघिरे यास अकोलेतील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अकोले पोलीस ठाण्यात परस्पर विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून पहिली फिर्याद आकाश सुरेश वाघीरे (रा. शाहूनगर ) याने दिली असून आरोपी विजय बबन चव्हाण, गणेश विजय चव्हाण व गणेश बबन माने (रा. सर्वं शाहूनगर ) यांच्याविरोधात भा. द. वि. कलम ३०७,३२४,३२४,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद गणेश बबन माने याने दिली असून प्रदीप सुरेश वाघीरे, संदीप सुरेश वाघीरे, रोहित सुरेश वाघीरे व आकाश सुरेश वाघीरे यांच्या विरोधात भा. द. वि. ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.