अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- इयत्ता दहावीत शिकत असलेल्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील जवळा येथे घडली आहे.
या घटनेचा योग्य तपास लावावा या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने पारनेर तहसीलदार व पोलीस ठाण्यास देण्यात आले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून सतत गुन्हेगारी वाढत आहे.
तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून पोलिसांचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. वारंवार तालुक्यामध्ये गुन्हेगारी घटना घडत असताना पोलीस प्रशासन गप्प का आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात महिला व मुली या असुरक्षित असून भाजप या सरकारचा निषेध करीत आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था हे व्यवस्थित नसून आघाडी सरकारे फक्त खंडणी गोळा करण्याचे काम करीत आहे.
आरोपींना जबर वचक बसविण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करण्यात असा इशारा यावेळी देण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम