जागेचा वाद सासू-सुनेच्या जीवावर; चौघांनी केली लोखंडी गजाने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- सासू-सुनेला लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना येथील बुरूडगाव रोडवरील भोसले आघाडा परिसरात घडली.

जागा नावावर करून देण्यास नकार दिल्याने हा प्रकार झाला आहे. मारहाणीत सासू रूकसाना चारलस चव्हाण (वय 40) व त्यांची सुन तेजस सुरज चव्हाण (दोघी रा. समर्थनगर, भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) जखमी झाल्या आहेत.

जखमी रूकसाना चव्हाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सिल्व्हर झेंडे चव्हाण, वगैबाई सिल्व्हर चव्हाण, लक्ष्मण सिल्व्हर चव्हाण व सुनील सिल्व्हर चव्हाण (सर्व रा. समर्थनगर, भोसले आखाडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आरोपींनी फिर्यादी यांना, ‘तु राहत असलेली जागा माझ्या नावावर करून दे’, असे म्हणाले असता. फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता फिर्यादी यांना आरोपींनी लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केले.

फिर्यादी यांची सुन त्यांना सोडण्यास गेली असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सुनेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.