जमीनी बळकावल्या प्रकरणी मोठा खाजगी सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- काहीही झाले तरी शेतकऱ्यांनी व्याजाच्या रकमेपोटी आपल्या जमिनी खाजगी सावकारांच्या नावावर लिहून देऊ नये’ असे कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या वतीने अनेकवेळा आवाहन करण्यात आले.

आता सावकारांचे अनेक कारनामे उघड होऊ लागले आहेत. कर्जत तालुक्यातील रातंजन भिसे वस्ती येथील एक तक्रारदार (वय ५६) यांनी खाजगी सावकार सुखदेव दिनकर केदारी यांच्याकडून २ लाख रु.५ रु. टक्के व्याजदराने घेतले.

सन २०१५ साली घेतलेल्या २ लाखांच्या रकमेवर सलग २ ते ३ महिने प्रतिमाहिना १० हजार व्याज सावकाराला दिले. मात्र त्यानंतर प्रतिमहिना व्याज देणे तक्रारदारास जमले नसल्याने सावकाराने पैशांसाठी तगादा लावत घरी येऊन शिवीगाळ केली.’पैसे दे नाहीतर जमीन नावावर करून दे’ अशी दमदाटी केली.

तक्रारदार भिसे यांची रातंजन शिवारात असलेली गट नं.४२/१/३ मधील ५० आर जमीन सावकाराने आपला मुलगा गणेश याच्या नावे कर्जत सबरजिस्टर येथे जाऊन दि.५ जाने.२०१६ रोजी धमकावून जबरदस्तीने नावावर करून घेतली. सावकार केदारी याच्याकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतर केलेली खरेदी पुन्हा पलटून देण्याचे ठरले होते.

त्यानंतर सुखदेव केदारी, गणेश केदारी,अशोक केदारी हे तिघांनी भिसे याना धमकावले. ‘व्याज व मुद्दलाचे पैसे द्या नाहीतर आम्ही तुमची जमीन दुसऱ्याला विकणार आहोत’ असे म्हंटले. या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांचा मुलगा यशवंत भिसे याने दि.२७ मार्च २०१६ रोजी विषारी औषध सेवन केले.

सुदैवाने त्याचा जीव वाचला. त्यानंतर एके दिवशी सावकाराने घरात घुसून आम्हाला मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर तक्रारदाराने अवैध सावकारीतुन बळकावलेली जमीन परत मिळण्यासाठी वकिलामार्फत नोटीस पाठवली होती.

त्यांनतर सावकार सुखदेव केदारी,गणेश केदारी,अशोक केदारी हे तिघे घरी येऊन ‘तु कर्जत पोलिस ठाण्यात आमच्या विरोधात गुन्हा दाखल करू नको असे म्हणत तक्रारदारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आज ना उद्या ते आपली जमीन नावावर करून देतील असे तक्रारदारास वाटले त्यामुळे फिर्याद दिली नाही. मात्र सावकार आता आपली बळकावलेली जमीन परत करणार नाही असा ठामपणे विश्वास वाटल्याने तक्रारदार यांनी तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe