Ahmednagar Crime : चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या कारणासाठी निपाणी जळगाव येथे विवाहितेचा छळ केला जात होता. सासरच्या लोकांकडून वेळोवेळी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मयत विवाहातीची आई गंगुबाई शंकर चेमटे ( नवीन चांदगाव उस्थळ दुमाला ता. नेवासा) यांनी सासरच्या लोकांच्या विरोधात आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
चेमटे यांची मुलगी अवंतिका हिचे लग्न दोन महिन्यापूर्वी पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव येथील विशाल सतीश चौधरी यांच्याशी झाले होते. चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी अवंतिकाचा छळ केला जात होता.
याबाबत मुलीने आई-वडिलांना सांगितले होते. वेळोवेळी होणाऱ्या छळाला कंटाळून बुधवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीची आई गंगुबाई चेमटे यांच्या फिर्यादीवरून पती विशाल सतिष चौधर, सासरा सतिष रघुनाथ चौधर, सासु संगिता सतिष चौधर, भाया अक्षय सतिष चौधर, जाव स्वरा अक्षय चौधर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.