हत्यार बाळगणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- इमामपुर घाटामध्ये रात्रीचे वेळी फिरताना दोघा जणांना हत्यारासह पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. भिमा अभिमान गिरे (वय 28), ज्ञानेश्वर छगन गिरे (वय 32, दोघे राह राघुहिरवे ता पाथडी जि अहमदनगर ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,

नगर ग्रामीण उपविभागिय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे सपोनि युवराज आठरे यांच्या सूचनेनुसार पोसई विनोद जाधोर,

पोहेकाॅ रमेश थोरवे, पोहेकाॅ महमंद शेख, पोना दिपक गांगर्डे, पोना गणेश कावरे, पोकाॅ संदिप आव्हाड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.10 ऑक्टोबर 2021 रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि युवराज आठरे यांना खब-यामार्फत बातमी मिळाली.

इमामपुर घाटात दोनजण दुचाकीवर हत्यारासह लोकांना लुटण्याचा तयारीनिशी बसलेले आहेत. या माहितीनुसार आठरे यांनी तातडीने पोलीस पथकाला घटनास्थळी जाऊन दोघांना पकडले.

पोलिसांनी जागीच पंचासमक्ष त्यांचे हातातील तलवारीसह जागीच पकडले. त्या दोघांना तात्काळ पोलीस ठाण्यात आणून त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe