शेअर बाजाराच्या नावाखाली लाखोंना गंडा

Published on -

अहिल्यानगर : क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या संस्थेच्या नावाखाली गुतवणूक दारांना १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडले व त्यानंतर एक रुपयाही न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळेया संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात याच्यासह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संदीप थोरात व दिलीप तात्याभाऊ कोरडे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या

या फसवणूक प्रकरणी गोरख सीताराम वाघमारे (वय ६३, रा. तहसील कार्यालयाजवळ पाथर्डी रोड, शेवगाव) यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.४) रात्री उशिरा फिर्याद दिली. याफिर्यादीत म्हटले आहे, क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा.लि. या संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सिताराम खरात, दिपक रावसाहेब कराळे, दिलीप

तात्याभाऊ कोरडे, नवनाथ सुभाष लांडगे, सचिन सुधाकर शेलार (सर्व रा. अहिल्यानगर) यांनी संगनमताने आखेगाव रोड, वरूर चौफुली, शेवगाव येथे संस्थेचे कार्यालय सुरु केले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या आरोपींनी विविध क्लृप्त्या लढविल्या. गुंतवणूकदारांना ठेवींवर १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषापोटी फिर्यादी गोरख वाघमारे यांनी २३ लाख १०० रुपयांची गुंतवणूक या संस्थेत केली. त्यांच्या प्रमाणेच इतर अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपये या संस्थेत गुंतविले. मात्र त्यांना

परतावा देण्यास टाळाटाळ सुरु करण्यात आली. वाघमारे यांनी याबाबत अनेकदा पाठपुरावा करून पैशांची मागणी केली. मात्र त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. गुंतविलेल्या २३ लाखांपैकी एक रुपयाही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस अधिक्षक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी होवून अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोरख वाघमारे यांच्या
फिर्यादीवरून

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe