पाथर्डी पाथर्डी शहर व तालुक्याची ओळख आता गुन्हेगार टोळीचे शहर म्हणून ओळख होवू पहात आहे. समाज कल्याण विभागाच्या गर्भगिरी मुलांच्या वसतीगृहातील एका विद्यार्थ्यांस अल्पवयीन मुलांच्या टोळीने बेदम मारहान केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, रविवारी रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी गर्भगिरी वसतीगृहाच्या समोर उभा असलेल्या कृष्णा खेडकर (रा. निपाणी जळगाव) या विद्यार्थ्यांस लाथा बुक्याने

खाली पाडून दगडाने मारहाण केली. या अल्पवयीन टोळीतील एका मुलाला जमावाने धरुन ठेवून त्याच्या आई-वडिलांना फोन केला. त्यानंतर त्यांनी देखील वसतीगृहाच्या कार्यालयात येवून पुन्हा कृष्णा खेडकर यास मारहाण केली व कार्यालयातील दप्तर खुर्चाची फेकाफेक करुन दहशत निर्माण केली. यावेळी तेथे उपस्थित
असलेले संस्थेचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण यांच्याही हाताला जखम झाली. याबाबत कृष्णा खेडकर याच्या फिर्यादीवरुन ओमकार रामदास ढाकणे, विक्रांत रामदास ढाकणे, अरबाज शेख, गिता रामदास ढाकणे, प्रशांत लगे, रामदास ढाकणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी लागले २४ तास
कृष्णा खेडकर यास मारहाण केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल २४ तास लागले. कधी सीसीटीएनएस प्रणालीचे सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगण्यात आले तर कधी इतर वेगवेगळी कारणे सांगून ठाणे अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेण्याचा प्रकार घडला. त्यामुळे गुन्हा दाखल करायला आलेल्या फिर्यादीस रात्र जागून काढावी लागली. २४ तासानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला असे सांगण्यात आले