अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा

Sushant Kulkarni
Published:

१५ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी नकेश उर्फ कृष्णा उर्फ गणेश छबु माळी (वय २१ रा.शेडाळ ता. आष्टी जि. बीड) याला विविध कलमान्वये दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तसेच ३ हजार दंड, दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच तसेच लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियमअन्वये दहा वर्ष शिक्षा व ३ हजार दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे गायके यांनी काम पाहिले.घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, पीडित मुलगी व तिची आई या दोघी चिखली येथील एका शेतकऱ्याचे शेतात मोलमजुरी करुन राहत होत्या. दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी पिडीत मुलगी, तिची आई आणि भाऊ हे शेतात कामाकरीता गेले.मात्र पिडित मुलगी व तिचा भाऊ हे लगेच घरी आले.

त्या नंतर पिडीतेची आई दुपारी घरी आली असता तिला पिडीता व तिचा भाऊ घरी दिसले नाही.म्हणून बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.तपास सुरू असताना दि.२५ नोव्हेंबर २०२३ राजी पिडीत मुलगी व आरोपी हे चाकोरे (ता. माळशिरस) येथे मिळुन आले.

पोलिस तपासामध्ये आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाला नवे कपडे घेऊन देतो अशी बतावणी करुन पिडीतेस पळवुन घेवुन जात तिच्यावर आत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर तिच्या जबाबावरुन आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

गुन्हयाचा तपास होऊन न्यायालयात दोषारोपत्र पाठविण्यात आले.सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले.त्यामधे प्रामुख्याने पिडीत अल्पवयीन मुलगी, तिची आई, डॉक्टर तसेच तपासी अधिकारी राजेंद्र चाटे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील पुष्पा कापसे गायके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सुजाता गायकवाड तसेच पो. कॉ. आशा खामकर यांनी सहकार्य केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe