१८ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कठोर कारवाई केली आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात स्वप्निल जैन (रा. श्रीरामपूर) आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी काही कारणास्तव बाहेरगावी जाण्यासाठी निघाली होती.आरोपीने तिला मी तुला सोडतो, असे सांगून विश्वास संपादन केला आणि तिला आपल्या गाडीत बसवले.मात्र,तेथे न नेता दुसऱ्या गावातील एका लॉजवर नेवून तिथे तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर गाडीमध्ये देखील पीडितेवर अत्याचार करण्यात आला.या घटने नंतर पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी स्वप्निल जैन याच्यावर रविवारी अत्याचाराचा व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल तपास अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहे.
आरोपीच्या हॉटेलची तोडफोड
दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलीच्या चिडलेल्या नातेवाईकांनी आरोपीच्या शहरातील हॉटेलमध्ये जावून फोडतोड केली आहे.आरोपी पीडित मुलीच्या नातेवाईकांना गेल्या काही दिवसांपासून धमकावत होता.आरोपीच्या सततच्या धमक्यामुळे पिडीत मुलीच्या नातेवाईकाने हातात दांडा घेवून आरोपीचे शहरातील हॉटेलची तोडफोड केली आहे.अत्याचारच्या घटनेमुळे शहर आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.