अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरात महिलांवर अत्याचार, मारहाण अशा घटना घडू लागल्या आहेत. यामुळे महिलांच्या अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे.
किरकोळ कारणातून महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना नगर शहरात घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालीद बाबर सय्यद (वय 25 रा. झेंडीगेट, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी त्यांच्या वडिलांना जेवण घेऊन गेल्या असतान सय्यद हा तेथे त्याची गाडी लावत होता. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाल्या, ‘माझ्या वडिलांचे वय झाले आहे, त्यांना चालता येत नाही, तू येथे गाडी लावू नकोस’.
असे म्हणताच सय्यद याला त्यांचा राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांचा विनयभंग केला आहे. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ गेला असता
त्यांना देखील सय्यद याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम