अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- गांजा बाळगणे गुन्हा आहे. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील दोघांनी लिंबाच्या बागेत चक्क गांजाची झाडे लावल्याची घटना समोर आली आहे.
कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शिवारात संयुक्त कारवाई करत एका शेतात सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडी दरम्यान गट नंबर ७००, ७०१यामध्ये लिंबोणीच्या झाडातच गांजाची लागवड केली आहे.
ही माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलीस पथक हे श्रीगोंदा शिवारातील या ठिकाणी छापा टाकला.
या ठिकाणी लिंबोणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केलेली होती. सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असणारे अरुण हरिभाऊ जगताप व बाळू हरिभाऊ जगताप यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत गांजाची लहान-मोठी पाला असलेली झाडे असा एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम