सव्वा कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एका आरोपीला अटक

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत १ कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार झाला होता. याप्रकरणी मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मोहन तुपे (मुकुंदनगर, नगर) असे त्याचे नाव आहे.

न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत अशोक माळी, आतिष विष्णू माळी (दोघे रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली) यांना यापूर्वीच अटक केली.

एमआयडीसीत दर्शन ब्रिजलाल सोनी (वय ५६, रा. बुरूडगाव रोड, नगर) यांची विवेक पॉली प्रॉडक्ट कंपनी व गोदाम आहे. आरोपी या कंपनीत नोकरी करत असताना त्यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत टेम्पोमध्ये प्लास्टिक वस्तू नेऊन सोनी यांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी सोनी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दीपक पाठक यांच्या पथकाने आरोपी तुपे याला शेंडी (ता. नगर) परिसरात अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe