७ जानेवारी २०२५ शेवगाव : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य संजय खैरे (रा. शेवगाव) याने माझ्या मुलीला (वय-१७), लग्नाचे आमिष दाखवून आरोपी ऋषिकेश दत्तात्रय थावरे (रा. शेवगाव) याच्या मदतीने फूस लवून पळवून नेले.
ऋषिकेश थावरे याच्या मदतीने अजिंक्य संजय खैरे याने मुलीचे अपहरण करून पळवून नेले होते.सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन पोलीस पथके तयार करून एक पथक पाथर्डी हद्दीत तर दुसरे पथक शिरूर, जि. बीड हद्दीत रवाना करण्यात आले होते.
सदर मुलीचा तसेच आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी गावच्या शिवारात असल्याची माहिती मिळाली.सदर ठिकाणी जाऊन पोलीस पथकाने पीडित मुलगी व आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपीस सदर गुन्ह्यात अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्र. एमएच १६ ओ क्यू २१९७ जप्त करण्यात आलेली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. समाधान नागरे, पोसई प्रविण महाले, पोहेकॉ. चंद्रकांत कुसारे, आकाश चव्हाण, शाम गुंजाळ, पोकॉ. संतोष वाघ, बप्पासाहेब धाकतोडे, प्रशांत आंधळे, राहुल खेडकर, संपत खेडकर, राहुल आठरे, एकनाथ गरकळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुंडु यांनी केली. पुढील तपास प्रविण महाले हे करत आहेत.