अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- नगर-सोलापूर रोडवरील वाटेफळ परिसरात नगर ग्रामीण पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रस्त्याच्या बाजुला खुलेआम बायोडिझेल विकणार्या तस्करांवर छापा टाकला.
या कारवाईत बायोडिझेल, रोख रक्कम, टँकर, ट्रक, कार असा एक कोटी 75 लाख 40 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच या सर्वाना पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून छापा सत्र सुरु आहे. यामुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर-सोलापूर रस्त्यावर अवैधरित्या बायोडिझेल विकले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
या माहितीनुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी दोन टँकरमधून वाहनांमध्ये बायेडिझेल भरले जात होते. पोलीस पाहताच पळापळ सुरू झाली. पथकाने 11 आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे
अविनाश पोपटराव नाटक, मुजमील राजु पठाण (रा. केडगाव), बंडू बाळासाहेब जगदाळे, चंद्रकांत शेखर सोनोणे (सर्व रा. रूईछत्तशी ता. नगर), विजय अशोक वाडेकर (रा. कोठला, नगर), योगेश भगवान गंगेकर,
अस्लम मुबारक सय्यद (रा. वाटेफळ), सचिन दशरथ लामखडे (रा. कातळवेढा ता. पारनेर), वाहन चालक अरूण माधयन, वेडीआप्पा गंगा दुरई (दोघे रा. तमिळनाडू), बाबासाहेब सखाराम बोरकर (रा. भोयरेपठार ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम