अहमदनगर जिल्ह्यातही पुष्पा ! चक्क इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक !

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :-  इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली.

११ लाख ८४ हजार रूपये किंमतीचे ३७० किलो चंदन, इनोव्हा (MH 12 JU 5644), मोबाईल, रोख रक्कम असा १८ लाख ९६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून चंदनाची वाहतूक करणारे सुभाष भिमराज दिलवाले (वय ४७), राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय ३० दोघे रा. चिंचोडी पाटील ता. नगर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदणी चौक ते जुने कलेक्टर आॅफिस जाणाऱ्या रोडवर सैनिक लाॅन गेट जवळ आज पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe