१३ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : चंदन तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र असे असले तरी देखील चोरी छुपे मोठ्या प्रमाणात चंदनाच्या लाकडांची तस्करी केली जाते. नुकताच याच धर्तीवर एक चित्रपट देखील प्रदर्शीत झाला आहे. प्रेक्षकांनी तर यातील नायकाला डोक्यावर घेतले आहे. अशीच चंदनाची तस्करी अहिल्यानगर जिल्ह्यात देखील केली जात आल्याचे समोर आले आहे.
जामखेड तालुक्यातील जवळके येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात चंदनाचा साठा सापडला आहे.तसेच या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, जामखेड तालुक्यातील जवळके येथे दि १० फेब्रुवारी रोजी दुपारी चंदनाची तस्करी व चंदनाचा साठा असलेची गोपनिय माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahmednagarlive-24-News-11.jpg)
त्या अनुषंगाने त्यांनी खात्री करण्यासाठी बनावट गिर्हाईक पाठवुन खात्री केली.त्यानुसार सदर ठिकाणी काका वर्धमान वाळुंजकर हा चंदन तरकरी करत असल्याचे समजले. सदर ठिकाणी आरोपीसह ३५ गोण्या ढलप्या व सालपट, चंदनाच्या गाभ्याचा १ तुकड़ा (वजन १.४ किलो), वाकास-३, तराजु-१, एक मोबाईल व मोटारसायकल असा मुद्येमाल ताब्यात घेतला आहे.सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची वनकस्टडी दिली आहे.