मुलीसह मध्यप्रदेशातून पळाला, राहुरी पोलिसांच्या बेडीत अडकला

Published on -

३१ जानेवारी २०२५ राहुरी : मध्यप्रदेश येथून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून आणलेल्या आरोपीस राहुरी पोलिसांनी ताब्यात घेत मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले तसेच मुलीचीही सुटका केली. मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील धनगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सनावत गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला चार महिन्यांपूर्वी फुस लावून राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथे आणण्यात आले होते.

मध्यप्रदेश पोलिसांनी तांत्रिक तपास करीत आरोपीचे स्थान निष्पन्न केले. त्यानंतर मध्यप्रदेश येथील धनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश कुमरावत यांनी राहुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून आरोपीबाबत माहिती दिली. राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस नाईक गणेश सानप, पोलिस शिपाई सागर नवले यांना कारवाईच्या सुचना दिल्या.

त्यानंतर राहुरी पोलिसांनी फुस लावून पळून आणलेल्या पीडित मुलीची सुटका करून आरोपी अजय जितेंद्र मोरे (वय १८, रा. जामणी, ता. छेगामा जि. खंडवा, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेतले. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात या आरोपीला देण्यात आले.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्वे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलिस उपनिरीक्षक संजय औटी, पोलिस हवालदार गणेश सानप, पोलिस शिपाई सागर नवले आदींच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!