अल्पवयीन मुलीवर युवकाकडून बलात्कार,मुलीने विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर शहरातील एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध घेतल्याने सुरुवातीला खाजगी आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान आज पहाटे दीडच्या सुमारास तिचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी याबाबत पुढील कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही,

मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला नाही असा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट कोतवाली पोलीस ठाण्यात आणला, जो पर्यंत संबंधित आरोपीं विरोधात गुन्हा दाखल होऊन अटक केली जात

नाही तो पर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवू देणार नाही अशी संतप्त भूमिका घेतल्याने काहीसा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

नातेवाईकांचा आरोप आहे की अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अत्याचार केला आहे. त्यानंतर मुलीने विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर आम्ही खाजगी आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केले, मात्र तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe