अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime:- नेवासे फाटा येथील रवी राजू भालेराव याच्यासह या टोळीतील सात जणांना दीड वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
या टोळीवर खून, दरोडे, खंडणी, मारहाणीचे अनेक गुन्हे या दाखल असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही तडीपारीची कारवाई केली आहे.
नेवासे फाटा येथे रवी राजू भालेराव याने टोळी तयार करून गुन्हेगारीस सुरूवात केली होती. रवीची टोळी ही २०१३ पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे.
बेकायदा गावठी पिस्तल बाळगणे, दरोडा टाकणे, खून करणे, मारहाण करणे असे सात गुन्हे या टोळीवर नेवासे पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
नेवासे पोलिसांनी या टोळीला अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या टोळीला दीड वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यामध्ये सतीश लक्ष्मण चक्रनारायण,
नितीन उर्फ मुन्ना असिफ महंमद शेख, शंकर उर्फ दत्तू अशोक काळे, निखिल किशनलाल चंदानी, रवी उर्फ रवींद्र शिवाजी शेरे, शिवा अशोक साठे यांना हद्दपार करण्यात आले आहे.