रेखा जर हत्याकांड : मुख्यमंत्री साहेब हे आपले अजब सरकार असे म्हणण्याची वेळ आलेली आहे….

Tejas B Shelar
Published:

Rekha Jare Murder Case :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील फिर्यादीचे वकील ॲड. सचिन पटेकर यांना अनोळखी इसमाकडून जिवितास धोका निर्माण झाला असून.

पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी त्यांनी आता पर्यंत पोलीस अधीक्षक ,अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी ,गृहमंत्री ,आदींकडे अर्ज व पत्रव्यवहार केला असून

शेवटी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांकडेही दाद मागण्यांचे ठरविले असून सदरच्या पत्राच्या प्रती त्यांनी औरंगाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडे माहितीस्तव पाठवला आहे.

यात ते म्हणाले आहेत कि, रेखा जरे हत्याकांडातील मी फिर्यादी तर्फे वकील असल्यामुळे मला अनोळखी इसमा कडून जीवितास धोका निर्माण झाल्याने मला पोलीस संरक्षण मिळणे बाबत मी वर दिलेल्या पत्त्यावर माझ्या कुटुंबासह राहत असून महाराष्ट्रात प्रसिद्ध रेखा जरे खून प्रकरणांमध्ये घटना घडल्यापासून फिर्यादी तर्फे वकील म्हणून मी स्वतः न्यायालयात कामकाज पाहत आहे

अहमदनगर येथील जिल्हा न्यायालय येथील स्टेशन केस क्रमांक १५६ /२०२१ भारतीय दंड विधान कलम 302, 120 ब, 34, 212 प्रमाणे खटला दाखल झाला असून तो न्यायालयात प्रलंबित आहे. सदर घटनेला एक ते दीड वर्षे उलटून गेलेला आहे परंतु आज देखील माझे जीवितास धोका निर्माण झालेला आहे त्यासंदर्भात मी वेळोवेळी माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांचेकडे अर्ज करून पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.

त्यावेळी पोलिस अधीक्षक साहेब यांनी सदर प्रकरणातील आरोपी अटक होईपावेतो मला संरक्षण दिले होते परंतु तद्नंतर मला देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. तसेच गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी माझे घरी जात घरी नसताना अनोळखी इसम चारचाकी वाहनात येऊन मी राहत असलेल्या परिसरात फोनवर कोणाशी तरी जोरात बोलून मी त्याच्या घरासमोर उभा आहे तू लवकर ये असे म्हणून परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अनोळखी इसमाकडून झालेला आहे.

याबाबत मला माझे परिसरातील लोकांनी घटनेची माहिती दिली होती.त्यानंतर मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना लेखी अर्ज करून सदर घटनेची दखल घेण्याची विनंती केली परंतु आजपावेतो कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यासंदर्भात मी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, पोलीस संचालक, पोलीस महानिरीक्षक ,अपर पोलिस अधिकारी अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधीक्षक यांना यासंदर्भात रजिस्टर पोस्टाने तक्रार अर्ज पाठवलेला होता तो त्यांना मिळालेला आहे त्याच्या पोस्ट पावत्या देखील मला प्राप्त झालेल्या आहेत. असे असताना अद्याप पावेतो सदर घटनेची कोणतीही कोणीही दखल घेतलेली नाही.

नगर शहरामध्ये विविध लोकांना माननीय पोलीस अधीक्षक मार्फत पोलीस संरक्षण देण्याचे आदेश काही घटनेमध्ये कारण नसताना दोन ते चार वर्षापासून शासना तर्फे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे ज्याला त्याची गरज आहे त्याला पोलिस संरक्षण मिळणे आवश्यक आहे परंतु ज्याला गरज नाही त्याला पोलिस संरक्षण दिले जाते ही बाब खेदजनक वाटते त्यामुळे मी माझ्या स्वार्थासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली नाही.

मी फक्त एका मुलाला, आईला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदर खटल्यांची न्यायालयीन कामकाज पाहत आहे त्यात माझा वैयक्तिक स्वार्थ नाही . त्यामुळे आता विरोधी पक्ष नेते यांच्याकडे दाद मागावी लागणार आहे काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

मुळातच मला पोलिस संरक्षणाची गरज का आहे कारण मी एखाद्याला फक्त न्याय मिळवण्यासाठी लढत आहे आणि सरकार माझ्याकडे पाहत नाही महाराष्ट्रातील एका खासदाराला झेड सिक्युरिटी असून देखील त्याच्यावर हल्ला झालेला होता मग मला एक पोलीस संरक्षण दिलं तरी माझे बरेवाईट होण्यास वेळ लागणार नाही.

मुख्यमंत्री साहेब हे आपले अजब सरकार असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. अहमदनगर शहरांमध्ये विनाकारण ओळखीच्या लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. यावरून असे म्हणावे लागेल की आरोपी व अनोळखी व्यक्ती यांची ओळख ही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे.

अर्ज पाठवून त्यांना तो मिळतो त्याची पोच पावती परत येते परंतु कोणतीही अंमलबजावणी होत नाही यावरून असे लक्षात येते की मी सुज्ञ वकील असून माझ्या अर्जाचा पंधरा ते वीस दिवसात कोणतीही दखल घेतली जात नाही . तर सर्व सामान्य माणसाचे काय हाल असतील हे विचार करणे देखील अवघड झाले आहे. तरी मला तातडीने पोलीस संरक्षण मिळायला हवे. अशी कैफियत ॲड. सचिन पटेकर यांनी अर्जाच्या प्रती द्वारे मा.उच्चन्यायालयाला माहितीस्तव कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe