Ahmednagar News : विवाहितेवर वारंवार अत्याचार, आरोपीच्या वडिलांना समजताच त्यांचेही गैरवर्तन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा आलेख हा चिंताजनक ठरत आहे. आता आणखी एक धक्कादायक वृत्त आले आहे. अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

पीडितेने घडलेला प्रकार अत्याचार करणाऱ्या तरुणाच्या वडिलाला सांगितला असता त्याने देखील पीडितेसोबत गैरवर्तन केले. याप्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रावसाहेब धरम, त्याचे वडिल रावसाहेब माधव धरम (दोघे रा. मोहिनीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी विवाहिता कुटुंबासह सह पुणे येथे राहतात. त्यांच्यावर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे अडीच वाजता गणेश धरम याने त्यांच्या राहत्या घरी अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्याची बहिण हिच्या घरी, पुण्यातील फिर्यादीच्या घरी व पुण्यातीलच दोन लॉजवर ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी अत्याचार केला.

गणेश याने फिर्यादीसोबत काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, घरच्यांना व फिर्यादीला कायमचे संपवून टाकण्याचा दम देऊन अत्याचार केला. तसेच फिर्यादीकडील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले.

घडलेला प्रकार फिर्यादीने गणेशचे वडिल रावसाहेब याला सांगितला असता त्याने देखील फिर्यादीसोबत गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान पीडितेने याप्रकरणी सोमवारी (दि. ५) कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गणेश धरम व त्याचे वडिल रावसाहेब धरम विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe