अहमदनगर जिल्ह्यात अनेक विचित्र घडामोडी मागील काही काळात घडलेल्या दिसल्या. यात अत्याचार, बालविवाह आदी घटनांचा समावेश आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक काळीज हेलवानरी बातमी आली आहे. जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. ही मुलगी संगमनेर तालुक्यातील आहे.
या एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेमसंबंध जुळले व त्यातून संबंध आले व त्यातून मुलगी गरोदर राहिली. परंतु ही घटना एवढीच मर्यादित नाही.
अधिक माहिती अशी : आश्रम शाळेत शिकताना त्या मुलीचे तिचे प्रेमसंबंध दहावीतील मुलाशी जुळले गेले. त्यानंतर दोघेही शाळा सोडून एका नातेवाईकच्या घरी राहायला गेले व तेथे त्यांचे संबंध आले. मुलगी गरोदर राहिली होती. त्या दोघांनी ही गोष्ट पालकांनाही सांगितली. जून २०२३ मध्ये ही मुलगी आईच्या घरी असताना ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलाच्या पालकांना हे सांगितले व लग्न लावून देण्यास सांगितले. तेही तयार झाले व त्यानंतर त्यांचा साध्या पद्धतीने विवाह लावून दिला गेला. दोघेही पती-पत्नी झाले. नंतर ती रुग्णालयात उपचारासाठी जात होती. पण ती मुलगी तिचे वय १९ असल्याचे सांगायची. १३ डिसेंबरला तिने मुलाला जन्म दिला. तेथील डॉक्टरांनी मुलीच्या वयाची चौकशी केली असता ते वय कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने डॉक्टरांनी स्थानिक पोलिसांना माहिती कळवली.
पोलिसांनी चौकशी करताच दोघांनी रितसर विवाह केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. परंतु असे असले तरी दोघेही अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यात आधार नसून हा बालविवाह ठरतो व तो गुन्हा आहे. शिवाय मुलाविरूद्ध तिच्यावर अत्याचार केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. आधी तपास पोलीस करत आहेत.