तुझ्याकडचे पैसे चूपचाप काढून आमच्याकडे दे. नाहीतर चाकूने ठार करेन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे महेश घोरपडे यांना चाकू लावून 25 हजार रुपये लूटून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत घोरपडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी ते व त्यांचा मित्र मुकुंद बाळासाहेब निमसे हे मोटरसायकलवरुन राहुरी ते टाकळिमिया रोडने घरी परत जात असताना काळ्या मारुती मंदिराच्या थोडे पुढे रोडचे साईडला राहुरी शिवार येथे लघुशंकेसाठी थांबले.

तेथे यातील आरोपी पिंटू ऊर्फ सुरेंद्र सांगळे आणि एक अनोळखी इसम हे एका विनानंबरच्या मोटरसायकलवर आले. आरोपी पिंटू ऊर्फ सुरेंद्र सांगळे हा मोटरसायकलवरुन खाली उतरला आणि त्याने घोरपडे यांच्या पोटाला चाकू लावून म्हणाला, तुझ्याकडे पैसे आहे,

मला माहीत आहे. ते तू चूपचाप काढून आमच्याकडे दे. नाहीतर तुला चाकूने ठार मारुन टाकीन. असे म्हणून त्याने घोरपडे यांच्या खिशातून 25 हजार रुपये घेऊन निघून गेले.

घोरपडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत पिंटू ऊर्फ सुरेंद्र विजय सांगळे व एक अनोळखी इसम अशा दोघांवर रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe