जामखेडमधील सहा प्रख्यात गुंड तडीपार, चौघे नगर जिल्ह्यातून, एकजण तीन व दुसरा चार जिल्ह्यातून हद्दपार !

Published on -

जामखेड परिसरात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच अग्नी शस्त्रासारखे घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा विविध प्रकारची या आरोपींवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक असणाऱ्या सहा गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दाखल केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, यातील चार गुंडांना नगर जिल्ह्यातून तर एकजणाला तीन जिल्ह्यातून व दुसऱ्याला शेजारील चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

तुषार हनुमंत पवार (वय १९, रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर), अक्षयकुमार अभिमान शिंदे (वय २४, रा. पोकळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहमदनगर), किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे (वय २८, रा. मिलींदनगर, ता. जामखेड), नितीन रोहीदास डोकडे (वय ३०, रा. गोरोबा टॉकीज शेजारी, ता. जामखेड), रमेश राजेंद्र काळे (वय ३८, रा. गोरोबा टॉकीज जवळ, ता. जामखेड), सिध्दांत ऊर्फ भाऊ राजु डाडर (वय ४६, रा. आरोळेवस्ती, ता. जामखेड) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, अग्रीशस्त्रासारखे घातक शस्त्रे जवळ बाळगून गैर कायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन अनुसुचित जमातीच्या व्यक्तीचा खुनाचा प्रयत करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करुन त्यांना शिवीगाळ व दमदाटी करणे.

गैरकायद्याची मंडळी जमवून खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे अशा विविध कलमान्वये जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना तडीपार करण्यासाठी जामखेड पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ व कलम ५६ अन्वये पोलिस अधिक्षक तसेच उपविभागीय अधिकारी कर्जत विभाग यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावांवर पोलिस अधिक्षक तसेच उपविभागीय अधिकारी कर्जतयांनी सुनावणी घेवून वरील सर्व आरोपींना तडीपार केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe