दुचाकीच्या डिक्कीतून रक्कम चोरली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून चार हजार 500 रूपयांची रोकड, सुहास साहेबराव शिरसाठ नावाचे आधार कार्ड चोरून नेले आहेत.

बुरूडगाव रस्त्यावरील जहागीर चौकात शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सतीष साहेबराव शिरसाठ (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (एमएच 16 बीएल 150) त्यांच्या घरासमोर उभी केली होती.

या दुचाकीच्या डिक्कीमध्ये साडेचार हजार रूपये व आधार कार्ड होते.

चोरट्यांनी ती रक्कम व आधारकार्ड चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक शाहिद शेख करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe