Ahmednagar Crime : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ! पतीसह सासू-सासऱ्यावर पोलीसांत गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सासरकडील लोकांकडून पैशासाठी वारंवार होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) घडली. मिनाक्षी शंकर जाधव (वय २४.), रा. पोकळे वस्ती, जामखेड, असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी सासरकडील पती, सासरे व सासू, अशा तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला केला असून, पोलिसांनी पती व सासऱ्याला अटक केली आहे.

शंकर भानुदास जाधव (पती), भानुदास केशव जाधव (सासरे), जयश्री भानुदास जाधव (सासू), अशी गुन्हा दखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,

मयत मिनाक्षी शंकर जाधव हिचा दि. २ डिसेंबर २०१९ रोजी म्हणजे पाच वर्षापूर्वी आरोपी पती शंकर भानुदास जाधव याच्यासोबत विवाह झाला होता. सुरवातीला सासरी नांदत असताना मूल होत नसल्याने मिनाक्षीचा छळ केला जात होता.

काही वर्षांनी तिला मुलगा झाला. मात्र, तरी देखील सासरकडील लोक माहेरुन पैसै आणण्यासाठी मिनाक्षीला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. याबाबतची माहिती मिनाक्षी हिने म माहेरकडील लोकांना दिली होती.

मात्र, तिचा छळ सुरूच होता. अखेर या छळास कंटाळून मीनाक्षी हिने दि. ३० जानेवारी २०२४ रोजी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिनाक्षी हिला एक वर्षाचा मुलगा आहे.

याप्रकरणी मयत मीनाक्षीच्या वडिलांनी जामखेड पोलीस दिलेल्या फिर्यादीवरून शंकर भानुदास जाधव (पती), भानुदास केशव जाधव (सासरे), जयश्री भानुदास जाधव (सासू), रा. पोकळे वस्ती, जामखेड, अशा तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती व सासरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe