Ahmednagar Crime News : तरुणाने सावकारांकडून दहा लाख रुपये घेतले ! नंतर वीस लाख दिले तरी सावकाराचे पोट भरेना…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : सावकाराच्या जाचाला कंटाळून येथील एका तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गावातील एका तरुणाने दोन सावकारांकडून दहा लाख रुपये घेतले होते. या सावकारांनी तरुणाची कागदोपत्री जमीन लिहून घेतली होती. तरुणाने सावकारांना दहा लाखाचे वीस लाख दिले असतानाही संबंधित सावकारांनी वेळोवेळी तगादा करून दमबाजी केली.

तसेच मारहाण करण्याची धमकी केली. या दोन्ही सावकारांच्या जाचाला कंटाळून या तरुणाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून काल या तरुणाला सावकारांनी शेतात घेऊन विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तरुणांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

संबंधित तरुणावर राहुरी फॅक्टरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्याची प्रकृती नाजूक असल्याने तो शुद्धीत आल्यावर पोलीस त्याचा जबाब घेणार आहेत. राहुरी तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खाजगी सावकारांनी बस्तान बसविले आहे.

या सावकारांच्या पठाणी वसुलीला कंटाळून अनेक जण गाव सोडून गेले आहेत तर काहींना आपली घरी दारे विकली आहेत. अशा घटना घडू नये म्हणून खाजगी सावकारांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe