हद्दच झाली! चोरट्यांनी शालेय पोषण आहार वाटपाचे साहित्यच चोरले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- जिल्हा परिषदेच्या शाळेचे कार्यालयाचे कुलूप बनावट चावीने उघडून शालेय पोषण आहार वाटपाचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.

बहिरवाडी (ता. नगर) येथे ही चोरी झाली. शाळेचे मुख्याध्यापक आदिलअहमद नजीरअहमद शेख (वय 49 रा. कृष्णा इंक्लेव्ह सोसायटी, आर. टी. ओ. कार्यालयाशेजारी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहिरवाडीचे कार्यालयाचे कुलूप कोणीतरी बनावट चावीच्या सहाय्याने उघडले. शालेय पोषण आहार वाटपाचे 20 स्टीलचे ताट, 40 चमचे, एक डब्बा, एक भातवडी आणि इतर स्टेशनरी असा सुमारे पाच हजार रुपयांचे साहित्य चोरले.

शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe