भावानेच मारला बहिणीच्या दागिन्यांवर डल्ला अन् ते दागिने

Published on -

अहमदनगर : भाऊ आणि बहिणीचे नाते जगात अनमोल आहे. अनेकदा भाऊ बहिणीच्या पाठीमागे खंबिरपणे उभा राहील्याची उदाहरणे आहेत. मात्र नगरमध्ये भावानेच बहिणीच्या घरी चोरी करून मोठाऐवज लंपास केला आहे. बहिण व मेहूणे त्यंाच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेले असता भावाने बहिणीचे घर फोडून तब्बल १६ लाखांचा ऐवज लंपास केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी येथील किराणा दुकानदार सुजय सुनिल गांधी हे दि.३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी बुरूडगाव येथे गेले होते.

ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास परत घरी आले असता, त्यांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तिन हजारांची लोखंडी तिजोरी असा एकुण ७ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.

याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता फिर्यादीच्या घरासमोर एक इसम मोपेड गाडीवरुन आल्याचे दिसुन आले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता फिर्यादीचा मेव्हणा सुरज प्रकाश लोढा याने त्यांच्या घरी चोरी करून आपल्याच बहिणीच्या सोन्याच्या बांगड्या मुथुट फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवल्या.

ही माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी लोढा याला अटक केली. तसेच त्याच्याकडून १६ लाख १८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ४ सोन्याच्या बांगड्या मुथुट फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवले असल्याची कबुली दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!