आरोपीच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि मुलांना सोडविण्यासाठी गेलेल्या संदीप मिटकेंच्या जवळून गेली वाचा त्या दोन तासात नेमकं काय झाले ?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :-  आज सकाळीच श्रीरामपूर विभागाचे धाडसी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने उपअधीक्षक संदीप मिटके बालबाल बचावले आहेत.

श्रीरामपूर येथील पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे घडली आहे.(The bullet escaped from the revolver and went near Sandeep Mitke)

मुलांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले….

याबाबत सविस्तर वृत्त असे कि राहुरी तालुक्यातील एका निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य वैशाली नानोर यांच्या मुलांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले होते.

मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता गोळीबार 

दोन दिवसांपूर्वी नानोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने खंडणी मागितली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केला आहे.

पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक

गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी सात वाजेच्या नानोर यांच्या घरात प्रवेश केला.

डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरले होते

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना दाबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरले होते. नानोर यांनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली.

रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न

त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला. उपअधीक्षक मिटके हे दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि…

यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, ती अधीक्षक मिटके यांचा डोक्या जवळून गेली. मिटके हे थोडक्यात बचावले. यावेळी मिटके यांच्यासोबत असलेल्या टिमनेही खूप झडप मारून धाडसी कारवाही केली

दरम्यान या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe