अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- मागील काही दिवसांपासून अनेक भागात भरदिवसा घरे फोडली जात आहेत.
यात शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली १८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे घडली.
याबाबत भिवसेन साहेबराव बोरकर (रा.देऊळगावसिद्धी, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरकर यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती शेतीच्या कामासाठी मळ्यात गेले होते.
त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडच्या गेटचे तसेच दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेली १८ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.