अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- मराठीत एक जुनी म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच प्रत्येक घरात पती पत्नीत किरकोळ वाद विवाद हे होत असतात. ते आपआपसात मिटत देखील असतात.(Ahmednagar Crime)
मात्र श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत निर्दणी व तितकाच वेदनादायी प्रकार समोर आला आहे. लष्करातील जवानाने पत्नी न सांगता माहेरी गेल्याच्या कारणावरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत, बांबूच्या काठीने तीला अमानुष मारहाण केली.
यात तिचे दोन्हीही पाय निकामी झाले आहेत. तिला सोडवण्यासाठी मध्ये गेलेला तिच्या भावाला देखील बांबूच्या काठीने मारहाण करण्यात आली आहे. दिलीप बबन पुराणे असे या जवानाचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील घोटवी येथील दिलीप बबन पुराणे या लष्करातील जवानाने पत्नी चैताली पुराणे हिला ‘तू माहेरी कुणाला विचारून गेली होती, असे म्हणत शिवीगाळ करत बांबूच्या काठीने अमानुष मारहाण केली.
या मारहाणीत तिचे दोन्हीही पाय निकामी झाले आहेत. यावेळी तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावास देखील काठीने मारहाण करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत सोपान चंद्रकांत लबडे यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दिलीप बबन पुराणे, शांताबाई बबन पुराणे, संगीता बबन पुराणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यांना अटक करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम