ड्रायव्हिंग स्कूल चालकानेच केला तरुणीचा विनभंगाचा; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- साध्य या स्पर्धेच्या युगात महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक ठिकाणी काम करत आहेत. मात्र अनेकदा त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

असाच प्रकार जामखेड येथे घडला. येथे कार चालवण्याचे प्रशिक्षण घेत असताना ड्रायव्हींग स्कुल मधिल एका तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी शहरातील एका ड्रायव्हींग स्कूलच्या चालका विरोधात विनभंगाचा गुन्हा दाखल केला असून संबंधित वाहन देखील पोलीसांनी जप्त केले आहे.

त्यामुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात गेल्या अनेक वर्षांपासून त्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मुली व महीलांना वाहन शिकवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

या स्कुलमध्ये ड्रायव्हींग शिकण्यासाठी एका तरुणीने अडमीशन घेतले होते.नेहमी प्रमाणे त्या दिवशी पीडित तरुणी ही ड्रायव्हींग शिकण्यासाठी आली होती.

यावेळी त्या ड्रायव्हींग स्कूलचा मालक व चालक असलेल्या इसमाने सदर तरूणीला ड्रायव्हींग शिकवत असताना स्टेअरिंग पकडण्याच्या बहाण्याने तरूणीचा विनयभंग केला.

या नंतर सदर तरुणीने जामखेड पोलीस स्टेशनला या बाबत फीर्याद दाखल केली त्या नुसार त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीला जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. ड्रायव्हींग स्कूलच्या चालकाने असा प्रकार केल्याने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe