अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- जवळा येथील अल्पवयीन मुलीचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.
त्यामुळे गळा दाबून मुलीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हत्या करण्यापूर्वी मुलीवर अत्याचार झाला असावा, असा संशय शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
या संशयाची खातरजमा करण्यासाठी मुलीचा व्हिसेरा नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. घटनेेच्या निषेधार्थ जवळे ग्रामस्थांनी गुरुवारी बंद पाळला.
शिरूर-बेल्हे मार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. जवळे येथे बुधवारी दुपारी १ च्या सुमारास या अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या तिच्या घरात आढळला होता.
मुलीच्या नातेवाईकांनी अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला हाेता.
त्यानंतर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. आमदार नीलेश लंके यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम