Ahmednagar Crime : विवाहितेचा छळ केला ! अखेर ‘त्या’ तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीगोंदा पोलिस ठाण्यात २०११ साली विवाहितेच्या छळ तसेच हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन, श्रीगोंदा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होत चाललेल्या खटल्यात न्यायालयाने मनोज आबा काळे व इतर २ तीन जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या बाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १२/२०११ भा.द.वि कलम ४९८ (अ) वगैरे प्रमाणे दाखल गुन्हयात तत्कालीन तपासी अंमलदार यांनी तपास करुन गुन्हयातील आरोपी मनोज आबा काळे व इतर २ यांचे विरुध्द श्रीगोंदा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी ३ रे अति मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीगोंदा यांचे न्यायालयात चालु होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकुण दिलेल्या पुराव्याचे आधारे या गुन्हयातील आरोपी मनोज काळे व इतर दोघे यांना भा.द.वि कलम ४९८ (अ) अन्वये १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व आरोपीस प्रत्येकी एक हजार रु दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास व हुंडा प्रतिबंध कायदा कलम ४ अन्वये ६ महिने कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपी मनोज आबा काळे यास ३२३ अन्वये ३ महिने कारावासाची व ५०० रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe