अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- शहरातील मुख्य भागामधील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारास रात्री एक वाजता तलवारीसह कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोंबीग ऑपरेशन चालु असतांना पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना माहिती मिळाली की, शहरातील मार्केट यार्ड भागात महात्मा फुले चौकात एक इसम हा त्याच्या हातात तलवार घेऊन
नागरीकांवर दहशत माजवत आहे व तेथील नागरीक घाबरुन गेले आहेत. त्यानूसार पोलिसांच्या पथकाने मार्केट यार्ड भागात जावून सदर इसमास हातातील तलवारीसह ताब्यात घेतले.
त्याचे नाव दिपक सुरेश बेऱ्हाडे (वय २३, रा-सारसनगर, मार्केट यार्ड) असे असल्याचे सांगीतले. त्यास तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवुन
त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीविरुध्द शहरातील एमआयडीसी व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम