कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या भामट्यास पोलिसांनी पकडले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- बँकेचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून 18 लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका भामट्यास माळीचिंचोरे येथील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत बापू दादासाहेब मंडलिक रा. माळीचिंचोरा ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे. या दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ऐहिक माहिती अशी कि, 25 सप्टेंबर रोजी एजाज चाँद शेख रा. बोधेगाव ता. शेवगाव हा आमचे घरी आला. त्याने मी आयडीएफसी बँकेच्या पैठण शाखेकडून आलो असल्याचे सांगून

तुम्हाला दोन लाखाचे सबसिडी असलेले कर्ज मंजूर करुन देतो असे म्हणून त्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबूक आदींच्या झेरॉक्स प्रती घेऊन निघून गेला.

त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी तो परत आला व कर्ज मंजूर झाले असून त्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये द्या अशी मागणी माझ्याशिवाय पुढील 17 जणांकडे केली.

याप्रकरणी बापू मंडलीक यांच्यासह इतर 17 जणांच्या फिर्यादीवरुन एजाज चाँद शेख रा. बोधेगाव ता. शेवगाव याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe