Ahmednagar News : टेलरिंगचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेची अज्ञात भामट्याने पर्स चोरी केली. ही घटना माळीवाडा बस स्थानकासमोरी उज्वला कॉम्प्लेक्स येथे घडली आहे. यात दागिने व रोख रक्कम असा ५५ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील बोरूडे मळा परिसरातील सिंधू दत्तात्रय बोरुडे या महिला माळीवाड्यातील बस स्थानकासमोर उज्वला कॉम्प्लेक्स येथे टेलरिंगच्या दुकानासाठी लागणारे मटेरियल खरेदी करण्यासाठी आल्या होत्य. त्यांनी येथील एका दुकानात सदरचे सर्व साहित्य खरेदी केले.
नंतर त्या साहित्याचे दुकानदारास पैसे देण्यासाठी त्यांनी त्यांची पर्स पाहिली असता, ती मिळून आली नाही, तेव्हा अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या पर्समध्ये ४५ हजार रुपयांचे दागिने व १० हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल होता.हे सर्व ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे. याबाबत बोरूडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केला आहे.