दहा लाखांची रोकड पळविणारा चोरटा अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- कर्जतच्या एका आडत दुकानदाराने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून दहा लाखांची रोकड काढली होती. ही रक्कम दुचाकीवरून बॅगमध्ये मार्केटकडे घेऊन येत असताना दोन हमाल कामगारांनी ही बॅग हिसकावून पळवुन नेल्याची घटना घडली होती.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर घटनेतील आरोपीला गजाआड करण्यात आता कर्जत पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी,पियुष रविंद्र कोठारी (रा.कर्जत) यांचे शेतकरी मार्केट कर्जत येथे आडत दुकान आहे.

शेतकऱ्यांकडुन खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी कर्जत येथील अर्बन बॅंकेतून त्यांनी दहा लाखांची रोकड आपल्या ताब्यात घेऊन ती बॅगमध्ये ठेऊन मोटार सायकलवर मार्केटकडे येत होते.

कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ विठ्ठल साळुंखे वय-२७ वर्षे व प्रमोद विजय आतार वय-१९ वर्षे, दोघेही रा.कोरेगाव ता.कर्जत यांनी फिर्यादी पियुष कोठारी

यांच्या मोटार सायकलवर असलेली बॅग हिसकाऊन पळवून नेली होती. याप्रकरणी आरोपींचा शोध घेणे सुरु होते. तपास केल्यानंतर घटनेतील आरोपी प्रमोद विजय आतार सध्या रा.कोरेगाव ता.कर्जत हा दि.२९ रोजी पोलिसांच्या गळाला लागला

असुन सोमनाथ साळुंखे हा फरार आहे. अटक असलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयाने दि.८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe