अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- शेतात जात असलेल्या तिघा जणांना पाच जणांनी मिळून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील पिंप्री शिवारात घडली आहे.
याप्रकरणी रसिदा करीम शेख (वय 55 वर्षे रा. पिंप्री वळण ता. राहुरी) यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रसिदा शेख व त्यांची जाव नजमा व मुलगा अल्ताफ हे खेडले-ब्राम्हणी जाणार्या चौफुलीवर त्यांची मोटरसायकल उभी करून रोडचे कडेला असलेल्या शेतात जात होते.
तेथे आरोपी यशपाल बापूजी पवार, भाऊदास फकिरचंद आगलावे, सागर वसंत जाधव, महेश भाऊसाहेब जाधव, जालिंदर विश्वनाथ कानडे आले व रसीदा शेख यांचे मोटरसायकलवर दगड व लाकडी दांडा मारून तिचे नुकसान केले.
त्यावेळी रसीदा शेख व तिची जाव हे आरोपींना म्हणाले, तुम्ही मोटारसायकल वर दगड का मारता? त्यावेळी आरोपींनी रसीदा शेख व त्यांची जाव नजमा, मुलगा अल्ताफ यांच्यावर दगड फेकून मारले.
तसेच त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम