Ahmednagar Crime : शेतात शेततळ्याचे काम करावयाचे नाही, असे सांगत वैभव कृष्णराव वाबळे, विशाल कृष्णराव वाबळे, कृष्णराव संभाजीराव वाबळे (सर्व रा. म्हातारपिंप्री, ता.श्रीगोंदा) आणि इतर पाच अनोळखी इसमानी दिलीप ज्ञानदेव हिरडे आणि त्यांचा भाऊ या दोघांना बेदम मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलीप ज्ञानदेव हिरडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत. या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या शेतात शेततळ्याचे काम सुरू असताना दि.४ रोजी फिर्यादी
यांच्या शेता शेजारी शेती असणारे वैभव कृष्णराव वाबळे, विशाल कृष्णराव वाबळे, कृष्णराव संभाजीराव वाबळे (सर्व रा. म्हातारपिंप्री, ता. श्रीगोंदा) आणि इतर पाच अनोळखी इसमानी तेथे येऊन दिलीप हिरडे आणि त्यांचा भाऊ असे दोघांना शेतात शेततळे करू नका असे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी हिरडे यांनी त्यांना तुमचे शेत शेजारून असल्याचे सांगितले याचा राग येऊन वरील तीन जनांसह आठ आनोळखी इसमांनी हिरडे बंधुला शेतात खाली पासून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.