Ahmednagar Crime : भर दुपारी बंद घराचे कुलूप तोडून घरातील तीन तोळे वजनाचे दागिने चोरले

Published on -

Ahmednagar Crime : भर दुपारी बंद घराचे कुलूप तोडून घरातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव येथे घडली आहे.’

या प्रकरणी सुभाष चंद्रभान कानगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.

या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी कानगुडे हे आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात उचकापाचक करून

६० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ९ हजार पाचशे रुपये रोख अशी एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार दि. १० रोजी भर दुपारी घडली.

याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत. दरम्यान, तालुक्यात दरोडे, घरफोड्या, मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe