खासगी वाहनातून प्रवास करणं महिलेला पडलं महागात; चुकवावी लागली ही किंमत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- खासगी वाहनातून प्रवास करणार्‍या प्रवाशी महिलेचे 42 हजार 270 रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेले.(Ahmednagar news) 

अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौक ते औरंगाबाद रस्ता दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच ते सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.

संगिता कानिफनाथ आढाव (वय 52 रा. पुणे, मूळ रा. भायगाव ता. शेवगाव) या कारमधून बायजाबाई जेऊर (ता. नगर) ते अहमदनगर असा प्रवास करीत होत्या.

औरंगाबाद रस्ता ते स्टेट बँक चौका दरम्यान त्यांच्या शेजारी बसलेल्या महिलेने पर्समधील सोन्याचे 42 हजार 270 रुपये किंमतीचे गंठण चोरले.

आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe